top of page

check water level तुमच्या बोर मध्ये किती पाण्याची पातळी आहे चेक करा मोबाईलवर | Indian Farmers Jugad

May 28, 2023


check water level : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपल्या बोअलवेलमधील पाण्याची पातळी केवळ काही मिनिटाच्या आत मोजता येणार आहे. हे पाणी मोजण्याचं ॲप पुण्यातील एका कंपनी कडून हे तयार करण्यात आलेलं आहे. मित्रानो, पाण्याची गरज सगळीकडे वाढल्याने अनेक भागात बोअरवेल खोदन्यात येत असतात.आपल्या बोअरवेलमध्ये बऱ्याच लोकांना पाण्याची पातळी नेमकी किती आहे हे माहित नसल्याने त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीतील पिकांसाठी किंवा घरातील कामासाठी पाण्याचा उपसा होत असतो. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही फक्त मेटल कॅपवर टॅप करून आपल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी किती आहे हे मोजता येणार आहे.


पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने एक नवीन app लाँच केले गेलेले आहे. ज्या माध्यमातून आपण केवळ अर्ध्या मिनिटात आपल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजु शकतोत. ही प्रक्रिया करण्यासाठी बोअरवेलची Cap उघडण्याची काहीच गरज नाही. एकदा का पाण्याची पातळी मोजून घेतली कि मग व्यक्ती आणि संस्थांना बोअरवेलच्या पाण्याच्या वापराबाबत योग्य व्यवस्थापन करता येईल. हे app पुण्यातील वॉटरलॅब सोल्यूशन्स या कंपनी कडून विकसित करण्यात आलेलं आहे.


Android सिस्टीमवर काम करणारे भुजल app गुगल प्ले स्टोर वरून मोफत डाउनलोड करता येते. भुजल वॉटर मॉनिटरिंग अॅप्स सोनार तंत्रज्ञानावरती काम करत असतात.प्रत्येक बोअरवेलला डिफॉल्टनुसार मेटल कॅपने झाकन्यात येत असते. केवळ दोन सेकंदांच्या अंतराने धातूच्या cap ला हातोडा किंवा लोखंडी रॉडने टॅप करणे आवश्यक असते.भुजल app वर कॅप्चर केलेल्या मेटलवर टॅप करून प्रतिध्वनी तयार होत असतो. त्यामुळे बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजण्यात मदत होत असते. या संपूर्ण प्रक्रियेला 30 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो असे वॉटरलॅब सोल्यूशन्सचे संस्थापक विजय गावडे यांनी सांगितले आहे. check water level


check water level ; borewell pump :- अटल भुजल योजना ही भारतातल्या 7 राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेली भूजल व्यवस्थापन योजना आहे व इतर एजन्सींसह गुजरात जलसंपत्ती विकास महामंडळासोबतही काम करताना दिसत आहे. check water level

वॉटरलॅब जवळ जवळ हरियाणातील 200 शेतकऱ्यांना नियमितपणे app वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पायलट प्रकल्प राबवत आहे. व तसेच महाराष्ट्रातील सिंजेंटा फाऊंडेशन व उस्मानाबाद येथील स्वयम् शिक्षण प्रयोग यांच्यासोबत काम करताना दिसत आहे.चे पेटंट वॉटरलॅबने घेतलेले असून त्याची IOT वर्जन घेऊन येत आहे असे बोल जात आहे. ज्यासाठी त्यांनी US मध्ये पेटंटसाठी अर्ज केलेला

4 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page